तुला काय वाटतं ?
तुला काय वाटतं ?
मी तुझ्या पाठोपाठ येतेय !
मी तुझ्या मागे मागे चालतेय ?
वेडा आहेस,खुळा आहेस ...
माझ्या डोळ्यात निरखून
पहा---अथांग सागराची लाट,उसळत,
लहरत जाणा-या लाटेबरोबरएक लाकडाचा ओंडका तरंगत जातोय...
पुन्हा दूसरी लाट उसळते,मागोमाग...
ओंडक्याला वाटते,ती लाट माझ्याच पाठोपाठ येतेय,मागेमागे चालतेय...
सांग,कोण कोणाच्या पाठोपाठ येतेय ?
तुला काय वाटते ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment