जाते आहेस...
जाते आहेस खुशाल जा..
तुटणारा तारा दाखवू नकोस...
आजही तुझ्या केसाना भिडणारा खटयाळ वारा दाखवू नकोस...
शपथा तुझ्या घेउन जा....
माझा वादा मागू नकोस..
तुझ्याच संगे संपलेला तो..
मुग्ध इरादा मागू नकोस...
जाते आहेस खुशाल जा..
वळणावर थाम्बू नकोस..
रोजच्या सारखी चुकून उगाच..
मागे वळून पाहू नकोस...
नीरस रात्रीला कधी..
तार-यांची आंदणीं मागू नको...
चन्द्र सारा तुझाच आहे..
शुक्राची चांदणीं मागू नको...
जाते आहेस खुशाल जा..
परत प्रेमात पडू नकोस...
धुंद होउन कधीही कुणाच्या वेड्या मनाला भिडू नकोस....
Subscribe to:
Post Comments (Atom)
hi...... nice.......poeam yaar...........
ReplyDelete