Tuesday, January 6, 2009

अस कुणीतरी भेटाव !!

अस कुणीतरी भेटाव !!
अस कुणीतरी भेटाव !!

अस कुणीतरी भेटाव !!
अस कुणीतरी भेटाव !!
अस कुणीतरी भेटाव !!
ज्याने आपले आयुष्य,
बदलून टाकाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
घ्यावा स्वप्नांचा ताबा,
मनानेही त्याला वश व्हाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
जगण्याला अर्थ यावा,
अन जीवनाच गाण व्हाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
कुणीतरी आपल्यावर हक्क सांगावा,
मनानेही ते हसत स्विकाराव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
दूर जाण्याची भीती सतत असावी,
कुणासाठी तरी आपण रडाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
आपला आनंद त्याच्या डोळ्यात दिसावा,
आपल दुखः त्याच्या डोळ्यात दिसाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
दाही दिशांमध्ये अस्तित्व जाणवाव,
अवघ विश्व त्यानेच व्यापून टाकाव,आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
श्वासागणिक त्याच नाव जपाव,
प्रत्येक श्वासाला त्याने साक्षी असाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
देवाकडे सतत त्यालाच मागाव,
ते दान ओंजळीत खरच पड़ाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
मीपण सारे विसरून जाव,
स्वताला त्याच्यात विरघलाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!

No comments:

Post a Comment