मन आणि मी ................
.
.
.
मी उगाच धरला गृहीत मनाचा बेत
मन वागत नही जसे ठरवले मीच
ते उंच उंच नभातुन उडून जाई
मी उगा शोधतो मनास अंधारात
.
.
मी सांगत होतो, शहाणे होणे त्याला
ते ठरवत होते जगात वेडे मजला
रात्रिस मी हरलो, बसलो होउनी हतबल
ते शहाणे होउन, बसले देवघरात
.
.
मी शिकवीत होतो गोडी सन्यासाची
ते मजला सांगत, सुन्दरता भोगांची
मी राम शिकविला, शाम दाविला त्याला
ते "प्रेम" घेउनी, दडून बसले आत
.
.
कुणी योगी बाबा काल भेटले होते
मी मन माझे मग, देवू केले होते
पण अजुनही मी आहे तैसा आहे
पण योगी रमले आज सर्व विषयात
.
.
या मनाचीच मी पूजा आता करतो
त्याहून कुणीही मित्र दूजा ना धरतो
मी मनाप्रमाणे आता ढळलो आहे
समजविण्याच्या पडत नाही फंद्यात
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment